अवकाळीमुळे द्राक्षमण्यात साखरेचे प्रमाण घटले; शेतकरी चिंतित

अवकाळीमुळे द्राक्षमण्यात साखरेचे प्रमाण घटले; शेतकरी चिंतित

निफाड। प्रतिनिधी | Niphad

दोन दिवसांच्या अवकाळी पाऊस (Untimely rain) व गारपीटीनंतर (Hail) आता पीक नुकसानीची (Crop damage) दाहकता समोर येवू लागली असून अनेक द्राक्षबागांमधील द्राक्षमण्यांची सुकवण वाढली असून द्राक्षमण्यांमधील साखरेचे (sugar) प्रमाण कमी होवू लागले आहेत. तसेच द्राक्षमण्यांना तडे जावू लागल्याने शेतकर्‍यांची (farmers) चिंता वाढली आहे.

तालुक्यातील श्रीरामनगर, शिवरे, जळगाव, निफाड, सोनेवाडी, रामपूर, जळगाव, काथरगाव, रसलपूर, सुंदरपूर, उगाव, शिवडी या परिसरात बुधवारी सकाळी अवकाळी पाऊस (Untimely rain) व गारपीट (Hail) झाल्याने या परिसरात द्राक्षबागांचे (Vineyards) मोठे नुकसान झाले आहे.

प्रारंभीचा पाऊस नंतर ढगाळ हवामान (Cloudy weather) यामुळे आधीच द्राक्षांची प्रतवारी घसरली असल्याने आता अंतिम क्षणी मिळेल ते दोन पैसे पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी व्यापार्‍याकडे सौदे करीत असतांनाच अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकर्‍यांच्या आशेवर नांगर फिरवला आहे.

परिणामी या पावसामुळे व्यापारी वर्गाने द्राक्ष खुडे बंद ठेवले आहे. यावर्षी द्राक्षाला अत्यल्प भाव मिळत असतांनाच अवकाळीने त्यात अधिक भर घातली आहे. गारपीटीमुळे वेलींवरील द्राक्षघड तुटून पडले, मण्यांना तडे गेले तर द्राक्षघडात पाणी साचल्याने या द्राक्षमण्यांची सुकवण होवू लागली आहे. अवकाळीचा फटका कांदा पिकाला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. कांदा पात तुटल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. तर गहू आडवा पडल्याने उत्पन्नात मोठी घट होणार आहे. या अवकाळीतून भाजीपाला पीक देखील सुटू शकले नाही.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षबागा उभ्या असून सुमारे 1 लाख एकरावरील द्राक्षबागांची काढणी थांबली असून या पावसाचा थेट परिणाम बाजारभाव घसरण्यावर होवू लागला आहे. साहजिकच यावर्षी द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकावर झालेला खर्च देखील फिटणे अवघड झाले आहे. शासन स्तरावरुन पंचनाम्याचा फार्स राबविला जातो. मात्र त्यानंतर कित्येक महिन्यांनी तुटपूंजी मदत देवून शेतकर्‍याची बोळवण केली जाते.

साहजिकच शेती वाचली पाहिजे अन् शेतकरी जगला पाहिजे यासाठी उत्पादन खर्चावर आधारीत शेतमालाला योग्य भाव देण्याबरोबरच नैसर्गिक आपत्ती येण्यापुर्वी घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपाययोजना याबाबत माहिती कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना मिळणे गरजेचे आहे. तसेच बनावट खते, औषधे यांना लगाम घालण्याबरोबरच शेतमाल विक्रीसाठी खात्रीची बाजारपेठ असणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com