<p><strong>विंचूर | Vinchur</strong></p><p>येथे गुरुवारी सायंकाळी सात वाजे नंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. </p>.<p>अवकाळी पावसाने कांदा, द्राक्ष,मका, गहू, हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असून अनेक शेतकऱ्यांनी एक्सपोर्ट ची द्राक्ष काढणी साठी लावलेला कागद काढून ठेवला होता. अशातच अवकाळी पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. परिपक्व द्राक्ष मण्यांना तडे गेले आहे. येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.</p>