दिव्यांगांसाठी राखीव निधी अखर्चित

गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देणार
दिव्यांगांसाठी राखीव निधी अखर्चित

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दिव्यांगांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी खर्च न केल्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलनाचे निवेदन देणार आहे.

याबाबत येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना सोमवारी (दि.१९) निवेदन देण्यात येणार वआहे.ग्रामपंचायत स्तरावरील पाच टक्के निधी खर्च न केलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आडसुरेगाव ,आहेरवाडी, आंबेगाव ,बाळापुर ,भारम बोकटे, देशमाने ,धामोडे, डोंगरगाव, गवंडगाव ,जळगाव नेऊर, कातरणी ,खैरगव्हाण, मानोरी बुद्रुक, मुखेड ,नागडे, नायगव्हाण, पारेगाव, पाटोदा, पुरणगाव, राजापूर, रेंडाळे, साताळी, शिरसगाव लौकी, सोमठाण देश ,सुरेगाव रस्ता, विसापूर या गावांचा समावेश आहे.

त्यामुळे या सर्व गावांतील सर्व दिव्यांगांतर्फे येवला पंचायत समिती आवारात सोमवारी (दि. १९) आपल्या हक्काच्या पाच टक्के ग्रामपंचायत निधी न वाटल्यामुळे आंदोलनाचे निवेदन देण्यात येणार आहे.अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्ष तालुका प्रमुख अमोल फरताळे ,प्रहार शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com