ना. रोड । Nashik

बंदी असलेल्या नॉयलॉन माजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

द्वारका परिसरात नायलॉन मांजामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. महिलेच्या मृत्यू नंतर शहरातील पोलीस प्रशासन खडबडून जागे झाली असून अनेक ठिकाणी कारवाया चालू आहेत.

अशातच मागील दोन दिवसांत नायलॉन मांजा विक्री प्रकरणी तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सातपूर, पंचवटी, नाशिकरोड आदी ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायलॉन मांजावर बंदी असतानासुद्धा नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजाची विक्री करणार्या एका विक्रेत्या विरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून मनपाच्या घनकचरा विभागामार्फत संबंधित मांजा विक्रेत्याच्या दुकानावर छापा टाकण्यात आल्यानंतर त्याच्याकडून मांजा जप्त करण्यात आला व सुमारे पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.