अवकाळी पावसाने द्राक्षबागांना फटका; काढणीसाठी तयार असणा-या द्राक्षबागा धोक्यात

अवकाळी पावसाने द्राक्षबागांना फटका; काढणीसाठी तयार असणा-या द्राक्षबागा धोक्यात

ओझे l Oze (वार्ताहर)

दिंडोरी तालुक्यात गेल्या चार दिवसापासून वातावरणा बदल होऊन बेमोसमी पाऊसची रिमझिम चालू झाल्यामुळे द्राक्षबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण असून द्राक्ष घडांना पेपर लावलेल्या द्राक्षबागाना फटका बसणार असल्याचे दिसत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

दिंडोरी तालुक्यात आर्ली छाटलेल्या द्राक्षबागामध्ये पाणी उतरून पूर्ण साखर आलेली आहे. असून या द्राक्षबागा विकण्यासाठी पूर्ण तयार झाल्या असल्यामुळे सतत पडणा-या रिमझिम पाऊसामुळे द्राक्ष मण्याना तडे जाण्याची शक्यता आहे. तर दुसरी कडे ज्या द्राक्षबागेतील घड पेपरने झाकलेले आहे आशा घडामध्ये पाणी गेल्यास मोठे नुकसान असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पावसामुळे पेपर जास्त प्रमाणात ओला झाल्यास द्राक्ष मण्यावर काळे डाग पडत असतता त्यामुळे द्राक्ष उत्पादकाना हा बेमोसमी पाऊस डोकेदुखी ठरत आहे. अनेक संकटावर मात करून कमावली द्राक्षबाग डोळ्यासमोर पावसात भिजत असताना द्राक्षबागायतदाराना किती वेदना होत असतील यांची कल्पना न केलेली बरी, त्यांमुळे पाऊसा थेंब जरी पडला तरी शेतक-यांचे काळीज धडधड करीत असते.

करोनामुळे मागील हंगामात द्राक्ष बागायतदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतक-यांना भांडवल देखील तयार करता आलेली नाही शेतक-यांनी द्राक्ष फेकून दिलेले असून पुन्हा चालू वर्षी बेमोसमी पावसाने झटका बसत असल्यामुळे द्राक्षशेती हे मोठे आव्हान ठरले असून द्राक्षशेती धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे.

सलग दोन दोन वर्षा शेतक-याचे नुकसान होणार असेल तर कोणता शेतकरी कर्जबाजारी होणार नाही हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची आवश्यता नाही. सध्याच्या परिस्थिती मध्ये द्राक्षबागाना पूर्ण खर्च करून झालेला आहे त्यांमुळे द्राक्ष उत्पादकापुढे बेमोसमी पावसाचे मोठे आव्हान उभे टाकलेले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com