
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा (Cold) जोर कमी झाल्याने ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यानंतर आज दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरासह आसपासच्या परिसरात रिमझिम पावसाने (Rain) अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले...
सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) दोन ते तीन दिवसांपासून भाविकांनी (Devotees) देवदर्शनासह पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र आहे. त्यातच आज अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने हे भाविक ओलेचिंब झाल्याचे दिसले.
दरम्यान, या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) परिणाम गहू, हरभरा आणि भाताच्या पिकावर झाल्यास शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच आंब्याचा (Mangoes) मोहोर फुलला असतानाच अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोहोर गळून पडण्याची शक्यता आहे.