त्र्यंबक तालुक्यात ढगांच्या गडगटासह पाऊस

शेतकऱ्यांची धावपळ
त्र्यंबक तालुक्यात ढगांच्या गडगटासह पाऊस

नाशिक | Nashik

आज सायंकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास त्र्यंबक तालुक्यात विविध भागात ढग दाटून आले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या आगमनामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

दरम्यान त्र्यंबकसह मोखाडा , हरसूल, इगतपुरी चा काही भाग आदी ठिकाणी सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले.

तसेच नाशिक शहरातील काही भागात पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळाली..

मोखाडा परिसरातही पावसाच्या सरी

सकाळपासून कडक सुर्यप्रकाश असताना आज रविवारी 3 ते 3.30 वाजेच्या दरम्यान अचानक ढग भरून आले व हलक्या विजेच्या गडगडाटासह सुखद पावसाच्या सरींचे आगमन झाले. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने नागरीकांना आल्हाददायक थंडावा जाणवला आहे. मात्र अचानक आलेल्या पावसाने वडे,पापड,कुरडया बनवणा-या महिलांची चांगलीच तारांबळ उडाली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com