
निफाड | प्रतिनिधी | Niphad
अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिपक्व झालेल्या द्राक्षमण्यांना तडे गेले असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
बुधवारी (दि. १५) रात्री निफाड तालुक्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काढणीस आलेल्या द्राक्षबागांचे या पावसाने मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.
परिपक्व झालेल्या द्राक्षमण्यांना तडे गेले आहेत. तर सोंगणीला आलेल्या गव्हाचेही नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगामी तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.