नाशकात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी

नाशकात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी

नाशिक | Nashik

नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्याने गहू, द्राक्ष, हरभरा या पिकांसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. विशेषता याचा फटका द्राक्ष बागांना बसणार असल्याने उत्पादकांमध्ये धास्ती आहे...

नाशकात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी
अभिनेते सयाजी शिंदेंवर मधमाशांचा हल्ला

आज सकाळपासून शहरात ढगाळ हवामान होते. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास ढग दाटून आले. यानंतर पावसाने महात्मानगर भागात तुरळक हजेरी लावली. तर सातपूर भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

नाशकात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी
खोट्या सह्या करून ३४ लाखांचा अपहार; लिपिकावर गुन्हा दाखल

दरम्यान, काल रात्रीपासूनच शहरात ठराविक भागात टप्याटप्याने पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. तर या अवकाळी पावसामुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com