नांदूर शिंगोटेत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

नांदूर शिंगोटेत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

नांदूर शिंगोटे | Nandur Shingote

गेल्या महिनाभरापासून राज्यातील तापमानात मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. नागरिकांना कधी पावसाच्या सरी तर कधी कडाक्याच्या उन्हाच्या झळा बसत आहे. एप्रिल महिना संपत आला तरी, अजूनही राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे.

नांदूर शिंगोटे परिसरामध्ये सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे आठवडे बाजारात नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले....

ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर कांदा पोळी ठेवलेल्या आहे. त्या झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली मात्र अचानकपणे पावसाचा जोर वाढल्यामुळे सर्वच कांदा पोळी झाकल्या गेल्या नाही. यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नांदूर शिंगोटेत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
Nashik Accident : दोन एसटी व ट्रकचा तिहेरी अपघात; पाच जखमी

दरम्यान, आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात गारपीट आणि जोरदार वादळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आलेला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर तसेच विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अकोला, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नांदूर शिंगोटेत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
APMC Election 2023 : मतदान संपलं, 'या' बाजार समित्यांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात; आता लक्ष निकालाकडे
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com