
कळवण | प्रतिनिधी | Kalwan
कळवण (Kalwan) शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळे बळीराजा संकटात सापडला आहे...
या अवकाळी पावसाने कांदा, टमाटे, द्राक्ष,आदींसह पिकाचे नुकसान झाले आहे. पाऊस व गारवा यामुळे मानवी जीवनावर व आरोग्यावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
सध्याचा हंगाम हा गहू हरभरा काढणी बरोबरच रब्बी कांदा काढणीचे काम सुरू आहे. अवकाळी पावसाने कांदा भिजत असल्यामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे.
ज्या शेतकऱ्यांचा कांदा शेतात व उघड्यावर पडून आहे आणि ज्यांच्याकडे कांदा झाकण्यासाठी सुविधा नाही अशा कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. या वातावरणाचा फटका पशुधनालाही बसत असल्याचे चित्र आहे.