Photo Gallery : ओझर, आडगाव शिवारात गारपीट; शहरातही सोसाट्याचा वारा

Photo Gallery : ओझर, आडगाव शिवारात गारपीट; शहरातही सोसाट्याचा वारा

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यातील ओझर, आडगावसह नाशिक शहरातील काही भागात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून वाढलेल्या तापमानानंतर आज अचानक सायंकाळी आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

आडगाव परीरातील गारपीट

तर तिकडे ओझरसह आडगाव पर्यंत गारपीट झाली असून अनेक रस्त्यावर तसेच घरांच्या अंगणात गारांचा खच झालेला होता. सगळीकडे लॉकडाऊन असताना अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या तसेच रुग्णांच्या नातलगांची आजच्या अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली.

नाशिक शहरातील ढगाळ वातावरण

गेली दोन तपमानाने या हंगामातील उच्चांक गाठत ३९.५ अंशांचा आकडा पार केला होता. मात्र, आज दीड अंशांनी नाशिक जिल्ह्यात तपमान कमी झाले होते. तरीदेखील उष्णतेमुळे हैराण झालेल्या नाशिककरांची काहीशी सुटका सायंकाळच्या वातावरणामुळे झाली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com