भऊरसह देवळा तालुक्यात अवकाळी

भऊरसह देवळा तालुक्यात अवकाळी

भऊर | वार्ताहर

देवळा तालुक्यातील भऊर, खामखेडा, सावकी, विठेवाडीसह तालुक्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने शेतमालाचे नुकसान झाले असून, खरीप पूर्वीच्या मशागतीचे कामात अडथळा निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची चांगलीच धांदल उडाली तर दुसरीकडे उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला....

सकाळपासून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असताना सायंकाळी आज जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतात पोळ घातलेला कांदा झाकण्यासाठी कांदा उत्पादकांची चांगलीच दमछाक झाली.

पावसाबरोबर आलेल्या जोरदार हवेमुळे मिरची पिकाचे काही प्रमाणत नुकसान झाले तर चारा पीक भुईसपाट झाला. ऊस सारख्या पिकांना मात्र या पावसाचा दिलासा मिळणार असल्याचे शेतकरी सांगतात. खरबूज, टरबूज पिकांना काही प्रमाणत याचा फटका बसणार असून कोबी, टोमॅटो सारख्या भाजीपाला पिकावर करपा, तुडतुडी सारख्या रोगाचा प्रादुर्भाव या पावसामुळे वाढणार आहे.

तालुक्यातील मुख्य पीक असलेला कांदा पिकाची बहुतांश काढणी झालेली असल्याने शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त झाला आहे. त्यातच आज पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मशागतीचे काम काही दिवस ठप्प होणार आहेत.

जवळपास दोन तास चाललेल्या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने नागरिकांना उकड्यापासून काही काळ दिलासा मिळाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com