त्र्यंबक परिसरात पावसाच्या सरी, नाशकात भुर भुर

त्र्यंबक परिसरात पावसाच्या सरी, नाशकात भुर भुर

नाशिक | Nashik

काल रात्री सोसाट्याचा वारा, त्यानंतर आज पहाटेपासून त्र्यंबक शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादलामुळे नाशिकसह जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण आणि सोसाट्याचा वारा वाहत आहे. काल रात्रीही जोरदार वारे वाहत होते. त्यानंतर आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

अनेक ठिकाणी या वादळामुळे झाडे, फांद्या तुटल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी शेडवरील पत्रे उडाले. आजही याबाबत सतर्कता बाळगण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com