
नाशिक | Nashik
मागील आठवड्यात जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, द्राक्ष, हरभरा या पिकांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला होता. त्यानंतर पुन्हा या आठवड्यात पावसाने (Rain) हजेरी लावल्याने बळीराजाच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे...
शहरात आज सकाळपासून ढगाळ हवामान (Cloudy weather) होते. यानंतर दुपारच्या सुमारास ऊन पडले होते. त्यानंतर चार वाजेच्या सुमारास ढग दाटून आल्याने पावसाने सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास शहरातील महात्मा गांधी रोडसह इतर परिसरात हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.