बेशिस्त वाहनचालकांनी भरला 'ईतका' दंड

बेशिस्त वाहनचालकांनी भरला 'ईतका'  दंड
USER

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, कोणीही शिस्त मोडू नये यासाठी वाहतूक विभागातर्फे Department of Transportation नेहमीच जनजागृती होत असते. सोबतच दंडही आकारला जात असतो. यावर्षी ई चलनमार्फत E-challan ऑनलाईन पद्धतीने 6 कोटी 63 लाख 55 हजार 900 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. गेल्या काही आठवड्यांपूर्वीच वाहतूक विभागाने न्यायालयीन प्रक्रियेमार्फत दंड वसुली करण्यासाठी उपक्रम राबविला होता. न्यायालयीन प्रक्रिया नको म्हणून वाहनधारकांनी आपला दंड ई चलनद्वारे भरला आहे.

नेमून दिलेल्या नियमावलीतील नियम डावलून कोणी इतरांना त्रास देत असे तर त्यावर प्रत्यक्ष दंड अथवा ई चलन मार्फत कारवाई करण्यासाठी दंड आकारण्याची सुविधा ठेवण्यात आलेली आहे. हा दंड आकारून एक प्रकारे पोलीस महसुलात वाढ होत असते. जागेवरच दंड आणि ऑनलाईन स्वरुपात दंड असे प्रकार आता अद्यावत करण्यात आले आहे.

जानेवारी ते सप्टेंबर 2020 अखेरीस शहरात 41 हजार 188 चालकांकडून जागेवरच 1 कोटी 27 लाख 38 हजार 750 रुपमांची दंडवसुली केली, तर 1 लाख 52 हजार 657 चालकांना 5 कोटी 63 लाख 41 हजार 100 रुपयांचा दंड आकारला होता.2021 मध्ये याच कालावधीत 28 हजार 189 चालकांकडून 1 कोटी 27 लाख 74 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर 1 लाख 44 हजार 920 चालकांना ई चलनामार्फत 6 कोटी 63 लाख 55 हजार 900 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्मामुळे गतवर्षीच्या तुलनेने 20 हजार 736 चालकांवरील कारवाई कमी झाली असली तरी दंडाची रक्कम 1 कोटी 50 हजार 620 इतकी वाढली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com