कळवण नगरपंचायतीच्या दोन जागा बिनविरोध

कळवण नगरपंचायतीच्या दोन जागा बिनविरोध
USER

कळवण । प्रतिनिधी Kalwan

कळवण नगरपंचायतीच्या (Kalwan Nagar Panchayat) प्रभाग क्र.. 11 व 12 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या (election) माघारदिनी नाट्यमय राजकीय घडामोडी (Political developments) घडल्यामुळे प्रभाग क्र. 11 मध्ये भाजपा (bjp) व अपक्ष उमेदवाराने माघार नोंदवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) हर्षदा जयेश पगार (Harshda Jayesh Pagar) तर प्रभाग क्र. 12 मध्ये आमदार नितीन पवार (mla nitin pawar), प्रगतशील शेतकरी (farmer) घनश्याम पवार, गटनेते कौतिक पगार काँग्रेसचे (congress) माजी शहराध्यक्ष प्रकाश पगार, नगरसेवक अतुल पगार यांची शिष्टाई यशस्वी ठरल्यामुळे चिठ्ठीचा कौल काँग्रेसच्या तेजस पगार यांच्या दिशेने पडल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.

कळवण (kalwan) नगरपंचायतच्या दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्र. 7 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौं सुनीता पगार (sunita pawar) यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे 14 जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान (voting) झाले. प्रभाग क्र 11 व 12 या दोन्ही प्रभागासाठी 18 जानेवारी रोजी मतदान होणार होते. तत्पूर्वी माघार दिनी भाजपा उमेदवाराची नाट्यमय माघार आणि चिठ्ठीचा कौल मान्य झाल्यामुळे दोन्ही जागा बिनविरोध करण्यात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) स्थानिक नेत्यांना यश आले.

प्रभाग क्र. 11 ची निवडणूक चुरशीची करण्यासाठी कळवण शहरातील अनेक नेत्यांनी नाट्यमय घडामोडी घडविल्यामुळे राष्ट्रवादीकडून हर्षदा पगार, भाजपाकडून वर्षाली पगार, अपक्ष भारती शिंदे यांनी नामनिर्देशन केल्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणे या प्रभागात मतदारांना पुन्हा लक्ष्मी दर्शनाची आस लागली होती. लाखो रुपयांची उलाढाल होण्याची मतदारांमध्ये चर्चा असतांना माघार दिनी दोन्ही उमेदवारांमध्ये समेट घडवून आणल्यामुळे भाजपाच्या वर्षाली पगार यांनी अखेरच्या क्षणी माघार नोंदवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा पगार बिनविरोध झाल्या.

गेल्या निवडणुकीत या प्रभागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक जयेश पगार हे अवघ्या एका मताने विजयी झाल्यामुळे एका मतांची किंमत त्यांनी अनुभवली होती. बिनविरोध निवडीमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 जागा बिनविरोध झाल्या आहे. प्रभाग क्र. 12 मध्ये राष्ट्रवादीचे छत्रसाल पगार व काँग्रेसचे तेजस पगार यांच्यात दुरंगी लढतीचे चित्र होते.

आमदार नितीन पवार, घनश्याम पवार, कौतिक पगार, अशोक पगार, प्रकाश पगार, भूषण पगार, माणिकराव पगार, साहेबराव पगार, अतुल पगार, प्रशांत पगार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रसाल पगार, काँग्रेसचे तेजस पगार यांची संयुक्त बैठक होऊन चर्चा घडवून आणली.बिनविरोध निवडीचा पर्याय पुढे ठेवून चिठ्ठीचा कौल मान्य झाल्यामुळे बैठकीत चिठ्ठीचा कौल काँग्रेसच्या तेजस पगार यांच्या दिशेने पडल्यामुळे राष्ट्रवादीच्या छत्रसाल पगार यांनी माघार नोंदवली. कळवण शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष तेजस पगार यांची बिनविरोध निवड होऊन काँग्रेसने खाते उघडले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com