लग्नाचा वायफळ खर्च टाळून वृद्धाश्रमाला दिला धनादेश

लग्नाचा वायफळ खर्च टाळून वृद्धाश्रमाला दिला धनादेश

नवीन नाशिक | Nashik

नाशिक जिल्ह्यातील विरगाव या गावचे 26 /11 मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अरुण चित्ते यांच्या मुलीने लग्नातील वायफळ खर्च टाळत मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रम पाथर्डी फाटा येथे आपल्या पतीसह येत 21 हजाराचा धनादेश देत नव विवाहितांसाठी एक आदर्श घालून दिला.

मुंबईतील 26 /11 च्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले अरुण चित्ते यांची मुलगी कोमल व नाशिक येथे राहणारे बंशीलाल बागूल यांचे चिरंजीव जयेश यांचा विवाह दहा लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

शासनाचे सर्व नियम पाळत व लग्नातील वायफळ खर्च टाळत शहीद चित्ते यांच्या पत्नी मनीषा चित्ते यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने लग्नात जास्त खर्च न करता सामाजिक काम केले पाहिजे असा विचार ठेवून अंध अपंग व वृद्ध रहात असलेल्या मानव सेवा केअर सेंटर या ठिकाणी जाऊन 21 हजाराचा धनादेश वृद्धाश्रमाचे संस्थापक नवसागर संचालिका ललिता नवसागर यांच्याकडे सुपूर्द केला.

वृद्धाश्रमातील अबालवृद्धांचे आशीर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मनीषा चित्ते यांना कोमल ,स्नेहल आणि खुशी या तीन मुली आहेत राहिलेल्या दोन मुलींच्या लग्नसमारंभात ही अशाच प्रकारची मदत आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कोमल चे मामा नितीन सोनवणे, सतीश शिरसागर ,वैभव चौधरी, कैलास सोनवणे उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com