आणि टोईंग गाडीत जमा केलेली वाहने उतरवली परत...

आणि टोईंग गाडीत जमा केलेली वाहने उतरवली परत...

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्रंबक नाका (Trembak naka) येथे पार्किंग (Parking) मध्ये लावलेली वाहने टोईंगच्या (towing) कर्मचाऱ्यांनी उचलून नेत असतांना नागरिकांशी झालेल्या वादामुळे टोईंग गाडीवरील (towing van) पोलीस कर्मचाऱ्याला त्यांची चुक लक्षात आल्याने टोईंग गाडीत जमा केलेली वाहने सोडून द्यावी लागली.

सध्या शहरामध्ये सर्रास नियमांचे उल्लंघन (Violation of rules) करून टोईंगची कारवाई सुरु असून वाहतूक विभागाने (Department of Transport) याकडे सर्रास डोळेझाक केल्याचे चित्र दिसून येत आहे. त्रंबक नाका परिसरातील हॉटेल राजदूत च्या बाहेर पार्किंगमध्ये (parking) लावलेली वाहने (दि. १८) टोईंगच्या कर्मचाऱ्यांनी अवैध रित्या उचलली. यावेळी टोईंग गाडीमध्ये (एमएच १५ ई जी ८९७१) असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याने माइकवरून गाडी काढण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची घोषणा न करता टोईंग कर्मचारी गाडीतून उतरून वाहने उचलण्यात व्यस्त झाली.

यावेळी येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी याठिकाणी हॉटेलची अधिकृत पार्किंग (Authorized parking) असून तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून सदरहू गाडी उचलली अशी विचारणा केली असता आम्ही साहेबांच्या सांगण्यावरून गाडी याठिकाणाहून उचलत आहोत असे सांगत दुचाकी वाहन टोईंगच्या गाडीत ठेवायला सुरवात केली. यावरून येथे जमलेल्या नागरिकांनी गाडीत असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला जाब विचारला असता त्यांना त्यांची चूक लक्षात आल्याने त्यांनी टोईंग कर्मचाऱ्यांना येथून उचललेल्या दुचाकी गाड्या वाहनधारकांना परत द्यायला सांगितले.

टोईंग कर्मचाऱ्यांच्या अरेरावीची अद्यापपर्यंत खूप तक्रारी आल्या आहेत. त्रंबकनाका परिसरात सर्व नागरिक एकत्र आल्याने टोईंग कर्मचाऱ्यांना उचललेली वाहने परत द्यावी लागली मात्र याठिकाणी एक दोन नागरिक असते तर त्यांना टोईंग कर्मचाऱ्यांच्या अरेरावीला सामोरे जाऊन अन्याय सहन करत आर्थिक झळ बसली असती. याप्रश्नी वाहतूक विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com