नाशिकमध्ये सुनियोजित विकासाच्या अपरिमित संधी

शेल्टरच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांचे उद्गार
नाशिकमध्ये सुनियोजित विकासाच्या अपरिमित संधी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

रिअल इस्टेट उद्योग (Real estate industry) हे रोजगार निर्मिती करण्यात देशातील दुसर्‍या क्रमांकाचे क्षेत्र असून नाशिकमध्येही सुनियोजित विकासाच्या अपरिमित संधी आहेत. युनिफाईड डीसीपीआर लागू झाल्यापासून बांधकाम क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली असून त्याचा लाभ ग्राहक व विकासक या दोघांनाही झाला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )यांनी केले. ते क्रेडाई नाशिक मेट्रो ( CREDAI Nashik Metro )द्वारे आयोजित शेल्टर या गृहप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आले.

या समारंभास नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, मनपा आयुक्त डॉ. सी. एल. पुलकुंडवार, क्रेडाई राष्ट्रीयचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष सुनील फुरदे, महाराष्ट्र क्रेडाईचे सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन, मानद सचिव गौरव ठक्कर, शेल्टरचे समन्वयक कृणाल पाटील, ललित रूंग्ठा, ईशा चंदे, जेएलएलचे प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालक करण सिंग सोडी हे मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, सर्वांच्या हिताचे निर्णय त्वरित घेण्यासाठी शासन अग्रक्रमाने काम करीत असून प्रलंबित मुद्द्यांवर पण लवकरच निर्णय घेण्यात येईल नाशिक पुणे रेल्वे मार्ग, आऊटर रिंग रोड असे असे नाशिकच्या विकासाला चालना देणार्‍या प्रकल्पास देखील गती देण्यात येईल. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते नाशिक फाईनेस्ट एज्युकेशन हब ऑफ इंडिया या सर्व्हेचे अनावरण करण्यात आले. पालकमंत्री भुसे म्हणाले की, येत्या काळात सर्व घटकांना एकत्र करून शहराच्या विकासाचा एक नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येणार असून आगामी कुंभमेळ्यासाठी सर्व संबंधित विभागाकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या आराखड्यासाठी क्रेडाईने सहकार्य करावे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी खा. हेमंत गोडसे, मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत व प्रास्ताविकात क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवि महाजन यांनी तर शेल्टरचे समन्वयक कृणाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, राष्ट्रीय क्रेडाईचे समिती प्रमुख घटना जितुभाई ठक्कर , महाराष्ट्र क्रेडाई चे सचिव सुनील कोतवाल तसेच माजी अध्यक्ष किरण चव्हाण , सुरेश पाटील, नेमीचंद पोतदार, उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत असून क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर , कोषाध्यक्ष हितेश पोतदार , सहसचिव अनिल आहेर, सहसचिव सचिन बागड आदी कार्यरत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com