Nashik : ग्रामपंचायत सदस्याची गाडी अज्ञातांनी पेटवली

Nashik : ग्रामपंचायत सदस्याची गाडी अज्ञातांनी पेटवली

पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

येथील ग्रामपंचायत सदस्य अमोल बागुल यांची गाडी (car) रात्री १ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी (Unknown Persons) पेटवून दिल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे...

Nashik : ग्रामपंचायत सदस्याची गाडी अज्ञातांनी पेटवली
Video : शहरासह जिल्ह्यातील विविध भागात पावसाची तुफान बॅटिंग

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत येथील पोलीस ठाण्यासमोर रूचा हॉटेल (Rucha Hotel) लगत अमोल बागुल यांची गाडी क्रमांक एमएच १५ एच.क्यू. ९८५५ पार्किंग केली होती. रात्री १ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी गाडीवर जळते टायर फेकून गाडी पेटवली.

Nashik : ग्रामपंचायत सदस्याची गाडी अज्ञातांनी पेटवली
त्र्यंबकसह, नाशिकमध्ये पावसाची हजेरी

त्यानंतर गाडीने ताबडतोब पेट घेतला. यावेळी पिंपळगाव बसवंत येथील अग्निशमन दलाला (Fire Brigade) तात्काळ पाचारण करण्यात आले असता अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत आग (Fire) विझविली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

Nashik : ग्रामपंचायत सदस्याची गाडी अज्ञातांनी पेटवली
Accident News : समृद्धी महामार्गावर तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

दरम्यान, याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात (Pimpalgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व घटना कैद झाली. त्यामुळे अज्ञात व्यक्तींना लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार (Ashok Pawar) यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com