पेठ तालुक्यात अज्ञातांकडून जाळपोळ

पेठ | Peth

तालुक्यातील मेंढाचापाडा, काळूणे, म्हसगण, आंबे परिसरातील शेतकऱ्यांनी (Farmers) शेतात साठवून ठेवलेली भात, उडीद पिकांची उडवी (गंजी) अज्ञातांनी पेटवून (Burning) दिल्याची घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, खरीपाचे धान्य (Kharif Grains) कापणीनंतर शेतातच रचून ठेवण्यात येत असल्याने रस्त्यालगत शेती असणारे मोतीराम महाकाळ (मेंढाचापाडा) हिरामण अलबाड (वखारपाडा ) नागू जाधव,रामदास शिंगाडे (काळूणे) परशराम चौधरी (म्हसगण) परशराम भडांगे, हौसाबाई गायकवाड (आंबे ) यांच्या शेतातील भाताची व उडीदाची (Paddy and Udid)उडवी (गंजी) एकाच दिवशी अज्ञाताने पेटवून दिल्याच्या घटनेने शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

दरम्यान, धान्य जळाल्याने आर्थिक नुकसानीबरोबरच जनावरांच्या (तणास) खाद्याचेही नुकसान झाले असून सदर घटनेची माहिती तहसीलदारांना (Tehsildar) देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com