मृतदेह आढळून आल्याने खळबळ; सिन्नर तालुक्यातील घटना

मृतदेह आढळून आल्याने खळबळ; सिन्नर तालुक्यातील घटना

नाशिक । Nashik

सिन्नर (Sinnar) तालुक्यातील मानोरी (Manori) शिवारातील एका विहिरीत अनोळखी मृतदेह (Unidentified deathbodies) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, मानोरी शिवारातील चांगदेव करडेल (Changdev kardel) नामक शेतकरी (Farmer) आज(दि२४) दुपारी बारा वाजेच्या सुमारास शेतात खत टाकण्याचे काम करत होते. त्याचवेळी त्यांना जवळच असणाऱ्या एका विहिरीतून (Well) दुर्गंधी येत असल्याने त्या विहिरीत डोकावले असता त्यांना प्लास्टिकच्या गोणीत बांधलेला मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले.

दरम्यान, याबाबतची अधिक माहिती वावी पोलीस ठाण्याला (Wavi police station) दिली. यानंतर तात्काळ वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते ( API Sagar Kote) यांच्यासह नांदूरशिंगोटे (Nandurshingote) दूरक्षेत्र व वावी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले.

स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला. पुढील तपास वावी पोलीस करत असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच ही घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com