आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित
आरोग्य विज्ञान विद्यापीठ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2020 मधील विविध विद्याशाखांच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित करण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी ही माहिती दिली.ते म्हणाले की, उन्हाळी सत्रातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, नर्सिंग, भौतिकोपचार आदी विद्या शाखांचे पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठाने यापूर्वी संकेतस्थळावर जाहिर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहेत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, अंतीम वर्षाच्या परीक्षेबाबत प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. परीक्षाघेण्यात येऊ नये या मागणीच्या दोन याचिका आणि पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षा लवकर घेण्यात याव्यात या मागणीसाठी एक याचिका अशा एकूण तीन याचिका परीक्षेच्या अनुषंगाने झालेल्या असून तीनही याचिका मा. उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी दि. 31 जुलै 2020 रोजी होणार आहे. त्या निर्णयानंतरच सविस्तर आदेश काढण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

आरोग्य शिक्षणातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व संबंधितांनी परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही अफवा व खोटया बातम्यांवर विश्वास ठेवू नये. परीक्षेसंदर्भात कोणत्याही परिपत्रकाची खातरजमा करण्यासाठी विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com