शस्त्र संग्रहालयाची साफसफाई करून बाबासाहेबांना अनोखी श्रद्धांजली

शस्त्र संग्रहालयाची साफसफाई करून बाबासाहेबांना अनोखी श्रद्धांजली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

श्री बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय परिसरात साफसफाई करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने (MNS) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना (Shivshahir Babasaheb Purandare) अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथांतून व ‘जाणता राजा’ नाटकातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे भगीरथ कार्य केले. राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेल्या श्री बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या संग्रहातील अनेक शिवकालीन शस्त्रे भेट दिली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नवीन पिढीसाठी उपलब्ध व्हावा, या हेतूने उभारले गेलेल्या शस्त्र संग्रहालयाची मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने साफसफाई करून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, शहर समन्वयक सचिन भोसले, नगरसेवक योगेश शेवरे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, रामदास दातीर, योगेश लभडे, शहर उपाध्यक्ष संतोष कोरडे, शहर सरचिटणीस अविनाश पाटील, विजय ठाकरे, ज्ञानेश्वर बगडे, पराग भुसारी, नील रौंदल, शैलेश उबाळे, नीरज जगधने, ऋषिकेश खैरनार, गणेश जाधव, मोनीश हिरे, प्रेमल गुजराती, किरण शिंदे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com