Video : शिवराज्याभिषेक दिनी शिक्षकांचे अनोखे अभिवादन

एक फलकलेखन तर दुसरे तैलचित्र : पहा व्हिडीओ
Video : शिवराज्याभिषेक दिनी शिक्षकांचे अनोखे अभिवादन

नाशिक । Nashik

आज राज्यात शिव राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदाचा राज्याभिषेक हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर चांदवड व नाशकातील दोन शिक्षकांनी आपल्या कलेच्या माध्यमातून शिवरायांना अनोखी मानवंदना दिली आहे.

आपल्या फलक लेखनातून नेहमीच आशावादी चित्र रेखाटणारे कलाशिक्षक देव हिरे यांनी आपल्या घरीच फळ्यावर खडूच्या सहाय्याने ६ फूट उंचीची 'सिंहासनाधिश्वर' छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा रेखाटून शिवरायांना वंदन केले आहे.

या फलक रेखाटनाचे वैशिष्ट्य - फळ्यावर फक्त पांढऱ्या खडूच्या साहाय्याने ही ६ फूट उंचीची 'सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज' यांची प्रतिमा 'स्टॅच्यु इफेक्ट' पद्धतीने रेखाटली आहे. फलकरेखाटना साठी आवश्यक सर्व नियम या रेखाटनात आहेत. जसे प्रमाणबद्धता,इमेजचा इतिहास, छाया-प्रकाश,ऐका खडूने तीन टोन चा इफेक्ट, इमेज चे कॅरेक्टर, इमेज चा बाणेदार व रुबाबदार पणा, इमेज ची तीक्ष्ण नजर, स्टॅच्यु इफेक्ट व कपड्याच्या सुरकुत्या,टेक्चर,हे सर्व फक्त एका पांढऱ्या खडूच्या साहाय्याने साध्य केलं आहे.

तसेच नाशिक येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मखमलाबाद येथील कलाशिक्षक सोमेश्वर मुळाणे यांनी लाॅकडाऊन काळात आपला छंद जोपासत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य तैलचित्र शाळेसाठी तयार केले आहे.

हा दिवस महाराष्ट्र सरकारद्वारे 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा होत आहे. आजच्याच दिवशी सन १६७४ ला किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला. छत्रपतींचा हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण पान. आजच्याच दिवशी मराठी मनाला व मराठी मातीला छत्रपती राजा मिळाला. सर्वांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आपल्या या जाणता राजाला फलक रेखाटनातून व तैलचित्रातून त्रिवार मानाचा मुजरा....!!!

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com