जलकुंभावर चढून नगरसेविकेचे अनोखे आंदोलन

जलकुंभावर चढून नगरसेविकेचे अनोखे आंदोलन

नवीन नाशिक | Nashik

नवीन नाशिक परिसरासह पाथर्डी फाटा उत्तम नगर पवननगर या परिसरात अनेक दिवसांपासून वेळी-अवेळी होणार्‍या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

सिडकोतील नगरसेविका किरण गामणे व सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांनी चक्क पाण्याच्या टाकीवर चढून मनपा व महापौरांचा निषेध करत आंदोलन केले.

नवीन नाशिक विभागात अनेक प्रभागात पाणीपुरवठा करण्यासाठी पाथर्डी फाटा येथे गंगा यमुना गोदावरी अशी जलकुंभ आहे. मागील काही दिवसापासून प्रभाग क्रमांक 27,28,29 मध्ये वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी मनपा कार्यालयात गेल्या आहेत.

परंतु वेळोवेळी तक्रारी करून देखील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व सेवक याकडे लक्ष देत नाहीत, असा आरोप नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे केल्यानंतर नगरसेविका किरण गामणे यांच्यासह नागरिकांनी पाथर्डी फाटा येथील जलकुंभावर चढून निषेध नोंदवत आंदोलन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com