ब्रिक्स बैठकीत नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार म्हणाल्या...

ब्रिक्स बैठकीत नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार म्हणाल्या...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

ब्रिक्स (BRICS) देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीसाठी आरोग्य, कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union MoS for Health and Family Welfare) यांनी पहिल्यांदाच हजेरी लावली. यावेळी त्या म्हणाल्या...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या गतिशील नेतृत्वात जागतिक हिताच्या दृष्टीने धोरणात्मक सहकाऱ्याकडे वाटचाल करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

यावेळी कोविड आणि नॉन कोविड (Covid & Non Covid) तथा रोगनिदान, लस, औषध निर्माण इत्यादींमध्ये नवकल्पनांना गती देऊन आरोग्यसेवा देणाऱ्या सुविधा अधिक चांगल्या करून जगाला भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्यांविरुद्ध एकत्रित लढा देण्यासाठी तसेच आरोग्य दृष्टीकोनावर भर देऊन साथींच्या रोगाविरोधात एकत्र येऊन काम करण्याचे सर्व ब्रिक्स देशांच्या आरोग्य मंत्र्यांना आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल, महामहिम डॉ. मा. शाओवे, (मंत्री, राष्ट्रीय आरोग्य आयोग, चीन), महामहिम डॉ.जो फाहला (आरोग्य उपमंत्री, दक्षिण आफ्रिका), महामहिम श्री. मार्सेलो क्विरोगा (आरोग्य मंत्री, ब्राझील), महामहिम श्री.मिखाईल मुराश्को (आरोग्य मंत्री, रशिया), महामहिम डॉ. टेड्रोस अदनोम (महासंचालक, डब्ल्यूएचओ) तसेच सन्मानित सदस्य, इतर अधिकारी भारत सरकारचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com