केंद्रीय मंत्री राणे राहिले नाशिक पोलिसांसमोर हजर

केंद्रीय मंत्री राणे राहिले नाशिक पोलिसांसमोर हजर

नाशिक। प्रतिनिधी (Nashik)

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्यावर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) दाखल केलेल्या गुन्ह्यात राणे यांनी शनिवारी (दि.२५) ऑनलाइन उपस्थित राहून (online present) जबाब नाेंदविला. यावेळी पाेलिस आयुक्त दीपक पांडेय (Nashik CP Deepak Pandey), गुन्हे शाखेचे पाेलिस उपायुक्त संजय बारकुंड (DCP Sanjay Barkund) उपस्थित हाेते...

पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना राणे यांनी सहकार्य केल्याची माहिती उपायुक्त बारकुंड यांनी दिली. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान २४ ऑगस्ट राेजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Udhav Thakaray) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राणे यांच्याविरोधात सायबर पोलिस ठाण्यासह राज्यात इतरत्र गुन्हे दाखल झाले होते.

त्यानंतर शिवसेना (Shivsena) व भाजपाचे (BJP) पदाधिकारी आमनेसामने आले होते. गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांचे पथक ना. राणे यांना अटक करण्यासाठी रत्नागिरी येथे गेले होते.

दरम्यान, राणे यांना न्यायालयाने सशर्त जामीन दिला होता. जबाब नोंदवण्यासाठी शहर पोलिसांनी राणे यांना नाेटीस पाठवली हाेती. यापूर्वी केंद्रीय मंत्री राणे २ सप्टेंबर रोजी नाशिक पोलिसांसमोर हजर राहणार होते. मात्र, गणेशोत्सवाचे कारण देऊन त्यांच्या वकीलांनी तारीख वाढवून घेतली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी राणेंच्या वकिलांशी बोलून २५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन जबाब घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार ना. राणे हे ऑनलाइन माध्यमातून हजर राहत जबाब नोंदवला.

Related Stories

No stories found.