केंद्रिय मंत्री गडकरींच्या हस्ते होणार 'या' प्रकल्पांचे लोकार्पण

केंद्रिय मंत्री गडकरींच्या हस्ते होणार 'या' प्रकल्पांचे लोकार्पण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) 226 कि.मी. लांबीच्या 1830 कोटींच्या प्रकल्पांचा लोकर्पण (Inauguration of projects) व कोनशिला आनावरण

केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते रविवार 18 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता इगतपुरी (igatpuri) येथे होणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar) यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील गोंदे ते प्रिंपीसदो फाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 चे 20 कि.मी लांबीच्या 866 कोटींचे सहापदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी या 37 कि.मी लांबीच्या सटाणा ते मंगरूळ (Satana to Mangrul) खंडाचे रूंदीकरण व दर्जोन्नतीकरणाच्या 439 कोटींच्या कामाचे, 10 वा मैल जऊळके-दिंडोरी व आंबेबहुला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 येथे 4.3 कि.मी च्या 211 कोटी रूपयांच्या भुयारी व उड्डाण पूल (flyover),

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 अ खंबाळे ते पहिणे व शतगाव ते अंबोली या 30 कि.मी लांबीच्या 38 कोटींचे कामाचे मजबूतीकरण, गुरेवाडी फाटा ते सिन्नर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 चे 9 कि.मी लांबी असलेल्या 14 कोटी किंमतीच्या खंडाचे मजबूतीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 अ मार्गावरील 53.500 कि.मी लांबीच्या मार्गावरील 11 कोटींच्या रस्ता सुरक्षा सुधार कार्य (Road safety improvement works), तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 पिंपळगाव-नाशिक-गोंदे या 51 कि.मी लांबीच्या मार्गावर 7.5 कोटी किमतीचे एलईडी पथदिवे लावणे या कामांच्या कोनशिलेचे आनावरण होणार आहे. त

सेच नांदगाव ते मनमाड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 जे या 21 कि.मी लांबीच्या 253 कोटी रूपयांच्या खंडाचे रूंदीकरण व दर्जोन्ननतीकरणाच्या कामाचे लोकार्पण केंद्रिय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 18 डिसेंबर 2022 रोजी गार्डन व्ह्यू महिंद्रा प्रकल्पाजवळ, मुंबई -आग्रा महामार्ग इगतपुरी येथे करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरण डी. (Collector Gangatharan D.), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक बी.एस. साळुंके, डी. आर. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे यांच्यासह संबंधित‍ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com