
नाशिक | Nashik
कांदा (Onion) दर वाढीच्या भीतीने केंद्र सरकारने (Central Goverment) ४० टक्के निर्यात शुल्क (Export Duty) लादण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून शेतकरी (Farmer) आक्रमक होत रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले होते...
यानंतर केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेत कांद्याला २ हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचे जाहीर केले. मात्र, त्यांनतरही कांदा व्यापारी असोसिएशनने (Onion Traders Association) जिल्ह्यातील कांदा लिलाव (Onion Auction) बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत होता.
त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Minister Dr. Bharti Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector's Office) आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री पवार यांनी बैठकीत कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढत कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात आला असून जिल्ह्यातील कांदा लिलाव बुधवार (दि.२३) पासून सुरू होतील अशी माहिती दिली होती. पंरतु, त्यानंतरही शेतकऱ्यांनी बाजार समित्या बंद ठेवत आंदोलन केले होते.
अशातच आता केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Union Commerce Minister Piyush Goyal) यांची भेट घेतली आहे. यावेळी मंत्री पवारांनी वाणिज्य मंत्री गोयल यांना एक पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की, कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करण्यात आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारमार्फत लावण्यात आलेल्या या निर्यात शुल्काविरोधात पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.