दिव्यांग बांधवांना केंद्रीय मंत्री डॉ.पवार यांनी न्याय द्यावा: पाटील

दिव्यांग बांधवांना केंद्रीय मंत्री डॉ.पवार यांनी न्याय द्यावा: पाटील

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी (Medical certificate) मुकबधिर व कर्णबधिर, दिव्यांगांची फरपट होत असून तीन महिन्यापासून जिल्ह्यातील दिव्यांग (disabled) बांधवांना सिव्हिल हॉस्पिटल नाशिक (Civil Hospital Nashik) येथे चकरा माराव्या लागत आहेत.

दिव्यांगांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शिवसेना निफाड तालुका प्रमुख प्रकाश पाटील (Shiv Sena Niphad Taluka Chief Prakash Patil) यांनी केली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारे विविध लाभ पदरात पाडून घेण्यासाठी दिव्यांग बांधवांना दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक असते. करोना (corona) संकटकाळात या प्रमाणपत्रांचे वाटप बंद असल्याने दिव्यांग बांधवांची मोठी गैरसोय झालेली होती. परंतु,सद्या सर्व सुरळीत सुरु असुनही दिव्यांगांना वैद्यकिय प्रमाणपत्र घेण्यासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये (Nashik District Hospital) वारंवार हेलपाटे मारुनही वैद्यकिय प्रमाणपत्र मिळत नाही. ३-३ महिने जिल्हा रुग्णालयाचे उंबरठे घासुनही कर्णबधिर व मुकबधिर दिव्यांग बांधवांची परवड सुरू आहे.

दिव्यांग म्हणजेच कोणत्याही प्रकारचे अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना विविध कारणांसाठी, तसेच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता भासत असते. संजय गांधी निराधार योजना, शैक्षणिक, रेल्वे, तसेच बसचे पास या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. परंतु, वैद्यकीय प्रमाणपत्राअभावी बांधवांची फरपट होत आहे.

अनेक दिव्यांगांना एसटीच्या पाससह अन्य सुविधांचा लाभ घ्यायचा असतो. परंतु, प्रमाणपत्राअभावी त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळेच लवकरात लवकर मुकबधिर व कर्णबधिर दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्रांचे वाटप तात्काळ सुरू करावे, अशी मागणी शिवसेना निफाड तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे केलेली आहे.आरोग्य मंत्री डॉ.भारती पवार यांनी विशेष लक्ष द्यावी, अशी मागणी शिवसेना,निफाड तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com