Nashik News : केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवारांच्या हस्ते २० खाटांच्या रुग्णालयाचे उद्घाटन

Nashik News :  केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवारांच्या हस्ते २० खाटांच्या रुग्णालयाचे उद्घाटन

वणी । वार्ताहर | Vani

येथे केंद्रीय आरोग्य विभागांतर्गत (Under Central Health Department) २० खाटांच्या फिल्ड रुग्णालयाचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Minister Dr. Bharti Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे आता वणी ग्रामीण रुग्णालयात (Vani Rural Hospital) इ.सी.आर.पी. २ अंतर्गत अद्यावत अशा सुविधा उपलब्ध असणार आहे...

यावेळी ग्रामीण रुगणालयातील प्रसुतीगृह व सामान्य कक्षाचे नुतनीकरणाचे उद्घाटन देखील करण्यात आले. याप्रसंगी शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात (Surgeon Dr. Ashok Thorat) निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. बी. एन. मोरे, सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, भाजपा (BJP) पदाधिकारी महेंद्र पारख, मयुर जैन, डॉ. मधुकर आचार्य, कुंदन जावरे, प्रकाश ठाकरे यासह मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, याप्रसंगी ग्रा.पं.सदस्य रंजना पाडवी, राकेश थोरात, विजय बर्डे, किरण गांगुर्डे भाजपा पदाधिकारी निखिल कटारिया, परेश जन्नानी, बाळासाहेब घडवजे, दिनेश कडवे, जमीर शेख, सतिश जाधव, भाजपा कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com