
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) जन आशीर्वाद यात्रेला (Jan Ashirwad Yatra) पोलिसांनी परवानगी नाकारली होती....
मात्र तरीदेखील यात्रेमध्ये रॅली (Rally) काढल्यामुळे भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे (Girish Palve) यांच्या विरोधात चार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.
त्यात अंबड (Ambad), भद्रकाली (Bhadrakali), सरकारवाडा (Sarkarwada), पंचवटी (Panchavati) या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
काल भाजपतर्फे जन आशीर्वाद यात्रा व वाहन रॅली काढण्यात आली. याकरिता भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी पोलिस आयुक्तांकडे परवानगी मागितली होती मात्र करोनामुळे (Corona) पोलीस प्रशासनातर्फे या यात्रेला परवानगी नाकारण्यात आली होती.
मात्र तरीदेखील पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथून जन आशीर्वाद यात्रेची सुरूवात झाली व दुचाकीची रॅली देखील काढण्यात आली. यामुळे अंबड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक अशोक आनंदा आव्हाड यांनी फिर्याद दिल्याने पालवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदन बगाडे करीत आहेत. तसेच पंचवटी, सरकारवाडा, भद्रकाली पोलीस ठाण्यातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...तर ५० टक्के तोटा केंद्र सरकार उचलणार
जन आशीर्वाद यात्रेत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी टोमॅटोचे (Tomatoes) भाव घसरल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीयमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तसेच केंद्रीय कृषिमंत्रानीही टोमॅटोची निर्यात सुरू असल्याचे सांगितले.
त्यांनी निर्णय घेऊन राज्याला पत्रव्यवहार करीत एमआयएस या योजनेअंतर्गत तत्काळ राज्याने टोमॅटो खरेदी केला तर त्यातील तोटा पन्नस टक्के केंद्र सरकार उचलेल, कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना या संकटकाळात आर्थिक फटका बसू नये म्हणून निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांना राज्याने मदत करावी यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा असे त्यांनी सांगितले.