मृतदेहावर अंत्यसंस्काराची अविरत सेवा

मृतदेहावर अंत्यसंस्काराची अविरत सेवा

पिंपळगाव ब.। वार्ताहर Pimpalgaon Basvant

येथील अमरधाम मध्ये काम करत असलेले पंकज इरावत Pankaj Iravat व त्याचे संपूर्ण कुटुंब सण असो की वार आपल्या कामात कधीही दिवस रात्र व्यस्त आहेत. करोना काळात सुमारे दीडशेच्या वर करोना बाधित व्यक्तीवर या कुटुंबांनी दिवस रात्र अंत्यसंस्कार केले funeral service on the corpse . यात बहुमोल साथ मिळाली ती इरावत कुटुंबांची अर्थात त्याची पत्नी आरती आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून चिता रचायचे काम आजही करत आहे.

सध्या नवरात्र सुरू असून अनेक महिला नऊ दिवस विविध व्रत करतात. तसेच नऊ दिवस उपवास करतात. या काळातही आपले व्रत सांभाळून चितेवर लाकडे रचण्याचे काम मात्र आरती यांनी चालू ठेवत आपल्या पतीला हातभार लावत आहे.

यावेळी आमच्या प्रतिनिधीने आरती पंकज इरावत Aarti Pankaj Iravat यांची भेट घेतली असता त्या म्हणाल्या की, येथील अमरधाम मध्येच आम्ही रहात असून हा आमचा पिढीजात उपक्रम आहे. सध्या नवरात्र उत्सव चालू आहे, पण जी सेवा आपल्या हातून घडत आहे त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. कधी-कधी एकाच वेळी जास्त अंत्यविधी होतात. अशा वेळी आमची मुले आम्हाला साथ देतात.

करोना काळात देखील कुणीही मृत आत्म्याच्या अंत्यविधीसाठी येत नव्हते. त्यावेळी देखील आम्ही आमचा जीव धोक्यात घालून मृत आत्म्याला शांती मिळावी यासाठी अमरधाम मध्ये सरण रचून मृत आत्म्याला सद्गती दिली. जिवंतपणी मानवाची सेवा करता नाही आली निदान मृत झाल्यावर तरी त्याची सेवा करण्याचे भाग्य मिळावे हाच दृष्टीकोन मनाशी बाळगून वेळप्रसंगी अमरधाममध्येच मुक्काम ठोकत संपूर्ण मृतदेहाची विल्हेवाट लागेपर्यंत आम्ही येथेच थांबून असतो.

पतीच्या खांद्याला खांदा लावत नवरात्रोत्सव काळातही आरती नामक नवदुर्गा Navdurga ने अंगिकारलेले व्रत उल्लेखनीय आहे. आज नवरात्रोत्सव काळात देखील नऊ दिवसांचे उपवास करण्याबरोबरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे काम तितक्याच जबाबदारीने पूर्ण केले जात आहे.

Related Stories

No stories found.