नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

अंबड पोलिस ठाण्याजवळ युनिक बिल्डिंग बंद गाळ्यासमोर एका अनोळखी अंदाजे 55 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला.

सदर मयत इसम हे पाच फुट दोन इंच असून मध्यम बांध्याचा, सावळ्या वर्णनाचा आहे.

सदर इसमाने निळ्या व सफेद रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट परिधान केलेली आहे तरी अशा वर्णनाची व्यक्ती कुणास ठाऊक असल्यास त्यांनी अंबड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन हवालदार गारले यांनी केले आहे.