निधीचे असमान वाटप

माजी जि. प. अध्यक्ष थोरे यांचा आरोप
निधीचे असमान वाटप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेत पदाधिकारी मनमानी कारभार करत असून प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराची त्यांना साथ मिळत आहे. रस्ते दुरूस्ती निधीचे तसेच लघुपाटबंधारे विभागातील नियोजन करतांना असमान वाटप करण्यात आलेले आहे. सदस्यांवर हा मोठा अन्याय आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी केला आहे. सदस्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी लवकरच पालकमंत्री यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या गुरूवारी होत असलेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेवर देखील माजी अध्यक्ष थोरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ऑनलाईन सभा घेण्याचा अधिकार, पदाधिकारी व प्रशासनाला कोणी दिला आहे, याबाबतचे शासन आदेश ऐआहे का? कोणत्या आदेशान्वये ऑनलाईन सभा घेतली जात असल्याचे सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पदाधिकाजयांचा प्रशासनावर कोणताही अकुंश नसल्याने प्रशासन मनमानी पध्दतीने कामकाज करत आहे. पदाधिकाजयांचे देखील मनमानी सुरू आहे.

रस्ते दुरूस्ती निधी नियोजनात असमान वाटप केल्याचे थोरे यांनी सांगत काही सदस्यांना अडीच ते तीन कोटींचा निधी तर, काही सदस्यांना केवळ एक कोटींचा निधी देण्यात आला आहे. बांधकाम सभापती यांच्याकडून समान निधी देण्याची घोषणा झाली होती. या घोषणेचे काय झाले असा प्रश्न उपस्थित करत झालेले असमान निधी वाटप रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.

लघुपाटबंधारे विभागातंर्गत निधी नियोजनात ठराविक सदस्यांनाच निधी देण्यात आला आहे. काही ठराविक तालुक्यातच मोठया प्रमाणात निधीचे वाटप केले असल्याचे नियोजनात दिसत आहे. सर्व सदस्यांना समान निधी देणे अपेक्षित असताना असमान निधी देऊन सदस्यांवर मोठा अन्याय केल्याचे थोरे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com