‘शासन आपल्या दारी’ अभियान : शुक्रवारी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

‘शासन आपल्या दारी’ अभियान : शुक्रवारी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

नाशिक। प्रतिनिधी

‘शासन आपल्या दारी’ अभियांनातर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यामाने शुक्रवार दि.१४ जुलै रोजी सकाळी १० वाजता डोंगरे वसतीगृह मैदान येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा पुर्न:नियोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता अनिसा तडवी यांनी दिली आहे.

आयोजित रोजगार मेळाव्यात रोजगार देणाऱ्या ५० पेक्षा अधिक विविध नामांकित कंपन्या व नियोक्ते सहभागी होणार असून ५ हजार पेक्षा जास्त पदांकरिता प्रत्यक्ष मुलाखती घेणार येणार आहेत.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी http://bit.ly/3XCprtR या लिंकवर नोंदणी करावी. तसेच ज्या उमेदवारांनी अद्याप सेवा योजना नोंदणी केली नसेल, अशा उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर उमेदवार पात्रतेनुसार रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.

भरती इच्छुक नियोक्त्यांनी महास्वयम वेब पोर्टलवर ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेयर’ या ऑप्शन वर क्लिक करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा यावर रिक्तपदे अधिसूचित करावी. नियोक्ते व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ०२५३-२९९३३२१ कार्यालयाच्या या दूरध्वनी क्रमांकावर तसेच nashikrojgar@gmail.com या इमेलवर अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती इमारत, पहिला मजला, आयटीआय सातपूर परिसर, त्र्यंबक रोड या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त तडवी यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com