
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील अनाधिकृत वृक्षतोडबाबत (Unauthorized felling of trees) नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन (Tree Authority Division) वेळोवेळी कारवाई केली जाते.
या मोहिमेची मनपाच्या सहा विभागात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे (Department of Parks and Trees Authority) पथक वृक्षतोडीच्या घटनांकडे लक्ष ठेवीत आहे. ही मोहीम आता आणखी कडक केली जाणार आहे. 1 फेबुवारीपासूनची आकडेवारी पाहता मनपाचे सहा विभाग मिळून एकूण 17 गुन्हे दाखल झाले आहेत.
अनधिकृतपणे वृक्ष तोडणा-यांकडून 23 लाख 71 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. सर्वाधिक सहा गुन्ह्यांची नोंद (Record of crimes) पश्चिम विभागात झाली असून पंचवटी (panchavati) विभागात सर्वात कमी एक गुन्हाची नोंद झाली आहे. मनपाच्या पथकाने रविवारी 12 मार्च रोजी सातपूर (satpur) विभागातील आनंदवल्ली शिवारात 45 फुट उंचीचे गुलमोहराचे डेरेदार झाड तोडून लाकूड घेऊन जाणारे वाहन मोठ्या शिताफीने पकडले होते. त्यातील दोन टन वजनाचा लाकूडफाटा पथकाने ताब्यात घेतला आहे.
वृक्ष प्राधिकरण उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे (Tree Authority Deputy Commissioner Dr. Vijayakumar Munde) यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष प्राधिकरण निरीक्षक किरण बोडके, आर. बी. सोनवणे, वैभव वेताळ, जगदीश लोखंडे, मुख्य माळी श्रीकांत इरनक यांचा पथकाने ही कारवाई केली. शहरातील नागरीकांनी, सोसायटीमधील रहिवाश्यांनी, प्लॉटधारकांनी वृक्ष छाटणी आणि वृक्ष तोडण्याकरीता मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन रितसर परवानगी घेऊनच कार्यवाही करणे आवश्यक आहे.
अन्यथा महानगरपालिकेकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई (Penal action) करण्यात येईल. तशी मोहिम शहरात राबवली जात असल्याने नागरीकांनी परवानगी घेण्याचे आवाहन मनपा उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे उप आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.
विभागनिहाय गुन्ह्यांची संख्या, दंड
नाशिक पश्चिम - 6 गुन्हे - 6 लाख 65 हजारांचा दंड
पंचवटी - 1 गुन्हा - एक लाख 75 हजारांचा दंड
नवीन नाशिक - 2 गुन्हे - 3 लाख 35 हजारांचा दंड
नाशिक पूर्व - 4 गुन्हे - 2 लाख 71 हजारांचा दंड
सातपूर - 2 गुन्हे - 3 लाख 40 हजारांचा दंड
नाशिक रोड - 2 गुन्हे - 5 लाख 85 हजारांचा दंड
एकूण - 17 गुन्हे - 23 लाख 71 हजारांचा दंड