निवेकच्या नुतन पदाधिकार्‍यांची एकमताने निवड

निवेकच्या नुतन पदाधिकार्‍यांची एकमताने निवड

सातपूर | प्रतिनिधी Satpur

येथील नाशिक इंडस्ट्रिज वेल्फेअर सेंटर (निवेक) (Nashik Industries Welfare Center) च्या नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत नुतन अध्यक्षपदी संदीप गोयल (Sandeep Goyal President, Niwec) यांची फेरनिवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी जनक सारडा (Janak Sarda Vice President- Niwec ) तर सरचिटणिस पदी रणजित सिंग सौंध, कोषाध्यक्षपदी प्रितपालसिंग बिर्दी व क्रिडा सचिव पदी पंकज खत्री यांची एकमताने निवड करण्यात आली.

निवेकच्या 2021-23 या द्विवार्षिकासाठी गव्हर्निंग कौन्सिलची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. विजयी उमेदवारांची विशेष बैठक माजी अध्यक्ष राजकुमार जॉली याच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या बैठकीला नवनिर्वाचित संदीप गोयल, जनक सारडा, गौरव चांडक, प्रतिपाल सिंग बिर्दी, जितेश वैश्य, निशांत धाम, श्रेयस राठी, शैलेश वैश्य, मंगेश पाटणकर, स्वप्नील भामरे, रणजीतसिंग सौंध, अशोक हेम्बाडे, राजेंद्र सूर्यवंशी, प्रणव संघवी, संदीप भदाने, पंकज खत्री आदी उपस्थित होते.

या बैठकीत नुतन कार्यकारी मंडळाची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीत स्वीकृत सदस्य म्हणून श्रीकांत कुमावत व गौरव धारकर यांची ही निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अध्यक्ष व्ही. के. भुतानी, सदस्य जे. एम. पवार, प्रदीप नवले व समन्वयक भूषण सदगूणे यांनी काम पाहीले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com