
उमराणे | वार्ताहर | Umrane
येथील विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Election) १९ मार्चला मतदान होणार आहे. तब्बल ९२ सदस्यांनी नामांकन दाखल करून इतिहास घडवला होता...
पंचायत समितीचे माजी उपसभापती धर्मा देवरे, माजी सभापती रतन देवरे, माजी सरपंच डॉ. दीपक जैन, दिलीप देवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे, माजी सभापती विलास देवरे, राजेंद्र देवरे, विद्यमान संचालक सुनिल दतु देवरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे, शेतकरी संघ चेअरमन संदिप देवरे, किरण देवरे आदी नेत्यांनी नामांकन दाखल केल्याने निवडणुकीत रंगत आली होती.
दरम्यान, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुनिल देवरे, डॉ. दीपक जैन, रतन देवरे, सचिन देवरे यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यकारी सोसायटीसाठी सर्व जागांवर २८ नामनिर्देशन पत्र दाखल करून तिसरी आघाडी तयार केली असल्याने तिरंगी व चुरशीची निवडणूक होणार दिसत होती.
प्रथमच मोठ्या संख्येने उमेदवारांनी नामांकन दाखल केल्याने आता निवडणूक बिनविरोध निवडणूक होणे अशक्य आहे असे वाटत होते. धर्मा देवरे, दिलीप देवरे, नंदन देवरे, दत्तू देवरे आदी नेत्यांनी दोन दिवसांपासून बिनविरोध निवडणूक पार पडावी असे प्रयत्न सुरू केले होते.
यासाठी तिसरी आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्यात आली. गावात शांतता नांदावी, निवडणुकीत खर्च कमी करून श्री रामेश्वर मंदिराचे बांधकाम सुरळीत पार पडावे, असे सांगून तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नकार दिला. जे होईल ते लोकशाही मार्गाने होईल, असे सांगितले. शेवटी ७९ उमेदवारांनीच माघार घेतली व आघाडीच्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.
यात सर्वसाधारण गटातून सुनिल देवरे, मोठाभाऊ देवरे, सचिन देवरे या प्रमुख नेत्यांसह पोपट देवरे, बाळासाहेब देवरे, माणिक देवरे, सुरेश देवरे, भगवान माने तर अनुसूचित जमातीमधून वसंत पवार, महिला प्रतिनिधी मधून नलिनी देवरे, संगीता देवरे, इतर मार्गासवर्गीय मधून किरण देवरे, विमुक्त जाती मधून संजय झाडे असे सर्व तेरा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकीचे कामकाज निवडणूक अधिकारी सविता शेळके यांनी पाहिले.