उमराण्यात मजूरही सुरक्षित नाहीत; कांद्याच्या खळ्यात शिरून चोरी

उमराण्यात मजूरही सुरक्षित नाहीत; कांद्याच्या खळ्यात शिरून चोरी

उमराणे | वार्ताहर Umrane

उमराणे (Umrane) येथे कांद्याच्या खळ्यातून (Onion) मजुरांच्या कष्टाच्या पैशांसह मुद्देमाल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी सीसीटिव्हीत (CCTV) कैद झाली आहे. याप्रकरणी देवळा पोलीस (Deola Police Station) तपास करत आहेत...

उमराणे (Umrane) येथील कांदा व्यापारी बाळासाहेब रंभाजी देवरे (Balasaheb Rambhaji Deore) यांचे मुबंई आग्रा रोड (Mumbai Agra highway) वर बायपास रस्त्यावर संजना आडत (Sanjana Adat) म्हणून कांद्याचे खळे आहे. या खळ्यात जायखेडा येथील राजेंद्र मोहिते हे दोन वर्षापासून परिवारासहित राहत असून तेथेच मजुरी करतात

मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास दोन चोरटे या खळ्यात शिरले. मागील बाजूस बांधलेल्या शेडमध्ये ते शिरले. तेथून त्यांनी सहा बॅगा उचलल्या. याठिकाणी मजुरांच्या दोन मुली माहेरी आलेल्या होत्या.

मुलींच्या बॅगेत साडेपंधरा हजार रुपये रोख होते. तसेच जावयाचा व मुलींचे असे तीन मोबाईल आधार, पॅन, शाळेचे दाखले आदि सर्व कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेली. एकूण 30 ते 35 हजार रुपयाची चोरट्यांनी चोरी केली असल्याचे बोलले जात आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झाली आहे. चोरीच्या घटनेनंतर रात्री बाळासाहेब देवरे (Balasaheb Deore) यांचा मुलगा अर्णव देवरे याने 100 नंबर डायल करून ही घटना कळवली. तात्काळ देवळा तालुका पोलीस स्टेशनचे (Deola Police Station) पोलीस कॉन्स्टेबल श्रावण शिंदे व शेख घटनास्थळी हजर होत तपास सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com