उमराणे : दर शनिवारी आणि अमावस्येच्या दिवशी होणार कांद्याचा लिलाव

उमराणे :  दर शनिवारी आणि अमावस्येच्या दिवशी होणार कांद्याचा लिलाव

उमराणे | प्रतिनिधी

स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणें येथे अमावस्येबरोबर आता दर शनिवारी सकाळी कांदा लिलाव सुरू राहणार असल्याची माहिती मुख्य प्रशासक सोनाली विलास देवरे यांनी दिली आहे. व्यापारी असो अध्यक्ष संदेश बाफणा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन सदर निर्णय घेण्यात आला

उमराणें येथे कांदा मार्केट सुरू होऊन साठ वर्षे झालीत तेव्हापासून लिलाव फक्त सोमवार ते शुक्रवार असेच होत आले आहेत शनिवारी आठवडे बाजार भरत असल्याने रविवारी बँका बंद असल्याने लिलाव होत नव्हते तसेच दर अमावास्येलाही व्यवहार अनिष्ट मानले गेल्याने लिलाव होत नव्हते.

परंतु गेल्या महिन्यापासून अमावास्येला लिलाव सुरू करण्यात आले तसेच कांदा आवक वाढल्याने शनिवार दि१२ जून पासून सकाळी ८.३० ते दुपारी १वाजेपर्यंत असे एका सत्रात लिलाव सुरू करण्यात आले आहे असे सचिव नितीन जाधव यांनी माहिती दिली आहे.

रोख पेमेंट ,१५ वजनकाटे, १५० व्यापारी खरेदीदार असल्याने भाव चांगला मिळतो ,ह्यामुळेच उमराणें कृषि उत्पन्न बाजार समितीचे नाव सर्वदूर झाले. जळगाव धुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कांदा व मका आदी माल विक्रीस येतो असे उपसचिव तुषार गायकवाड यांनी सांगितले आहे.

व्यापारी असो अध्यक्ष संदेश बाफणा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महेंद्र मोदी ,पांडूरंग देवरे प्रवीण देवरे,मुन्ना आहेर सुनील देवरे,साहेबराव देवरे सतीश देवरे,आव्हाड रमेश सुराणा, शैलेश देवरे आदी व्यापारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com