उमराणे  :  शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला
नाशिक

उमराणे : शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

परसुल शिवारात बिबट्याचे दर्शन

Abhay Puntambekar

उमराणे | वार्ताहर Umrane

गावापासून सात किमी. अंतरावर असलेल्या मेशी फाट्याजवळील शेतकरी खंडू उखा जाधव (३०) या शेतकऱ्यावर मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. यात जाधव यांच्या छातीवर हातावर जखमा झाल्या त्यामुळे त्यांना मालेगावी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व बिबट्याने एका शेळीवरही हल्ला केला आहे, अशी माहिती वनकर्मचारी सावकार यांनी दिली आहे.

परसुल शिवारात बिबट्याचे दर्शन

उमराणे गावाजवळ परसूल धरनाजवल सांगण्या मागंण्या नावाने प्रसिद्ध डोंगर आहे ह्या डोगराजवळ राहणारे शेतकरी गोरख भावराव देवरे यांच्या शेताजवळ काल दि ३ ला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दहिवड येथील शेतकरी कैलास सोनवणे ,साहेबराव सोनवणे, विकी सोनवणे, जावेद तांबोळी हे शेतात जात असताना त्यांना बिबट्या व तिचे पिल्ले यांचे दर्शन झाले. बिबट्या पहाताच त्यांनी पळ काढला एकाचा मोबाईल पडला त्यांनी ही घटना प्रहार संघटनेचे अध्यक्ष संजय दहिवडकर व नदन देवरे यांना कळवली असता तात्काळ वनविभागाला कळविण्यात आले.

वनाधिकारी साळुंखे ,मोरे,सावकार यांनी परिसराला भेट दिली तसेच उमराणे येथील फोटोग्राफर सतिश देवरे यांनी ड्रोण कॅमेरा आणून शोध घेतला असता अंधार व ढगाळ वातावरणामुळे शोध लागला नाही अखेर आजूबाजूचे सर्व शेतकरी यांना सावधानतेचा इशारा देत शोधकार्य थांबवले होते सकाळी पुन्हा प्रयत्न करण्यात आले बिबट्याचे पायाचे ठसे दिसून आल्याने दुपारी पिंजरा लावण्यात आला ,दहिवड उमराणे परिसरात घबराहट पसरली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com