उमराणे : ग्रामीण रुग्णालयातील ८ सेवकांचा अहवाल पॉझिटिव्ह

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष मांडगे यांची माहिती
उमराणे : ग्रामीण रुग्णालयातील ८ सेवकांचा अहवाल पॉझिटिव्ह

उमराणे | वार्ताहर Umrane

आज येथील ग्रामीण रुग्णालयातील ८ सेवकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात करोनाची एकूण रुग्ण संख्या १३ झाल्याने ग्रामस्थ व प्रशासन यांच्या चिंतेत भर पडली आहे.

१८ जुलै रोजी एक ७६ वर्षीय महिला करोना बाधीत झाली नाशिक येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच दिवशी निधन झाले होते तिच्या संपर्कातील ९ जणांचे पॉझिटिव्ह आले दि २८ जुलै १० दिवसानंतर ९ जण सर्व उपचार करून दुपारी २ वाजता घरी परत आले व गाव कोरोना मुक्त झाले.अशी बातमी कळत असतानाच ३ वाजता येथील इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळ असलेल्या किराणा व्यापाऱ्यांची आई वय ८७ पॉझिटिव्ह निघाली दुसऱ्या दिवशी परिवारातील ४ जण पोजिटिव्ह निघाले तर काल गुरुवारी रात्री आईचे निधन झाले.

दोन दिवसांपूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मालेगावी पॉजिटिव्ह आले होते म्हणून रुग्णालयातील सर्व सेवकांचा स्वॅब तपासणीस पाठवण्यात आला होता ९ पैकी ८ कर्मचारी पॉजिटिव्ह आले आहे त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष मांडगे यांनी दिली आहे .

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com