उमराणे : करोना बाधित वृध्देचा मृत्यू
नाशिक

उमराणे : करोना बाधित वृध्देचा मृत्यू

करोनासदृष्य लक्षणे आढळून आल्यास त्वरीत रूग्णालयात दाखल व्हावे- डॉ. सुभाष मांडगे

Abhay Puntambekar

उमराणे । वार्ताहर Umrane

येथील करोना बाधित ७६ वर्षीय वृध्देचा नाशिक येथे उपचार होत असतांना मृत्यू झाला. सदर वृध्दा बाधित आढळून आल्याने तिला तातडीने नाशिक सिव्हील रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.

मात्र उपचार होत असतांना रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. बाधित वृध्देच्या निकटवर्तीय असलेल्या ९ जणांना स्त्राव संकलनासाठी देवळा येथे हलविण्यात आले आहे.

संपुर्ण गावात आरोग्य पथकातर्फे संशयित रूग्ण तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. बाधित वृध्देचे निवासस्थान असलेला राममंदिर व गणपती मंदिर परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येवून प्रशासनातर्फे सील करण्यात आला आहे.

करोनासदृष्य लक्षणे आढळून आल्यास त्वरीत ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल व्हावे, असे आवाहन तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना केले.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com