करोना
करोना
नाशिक

उमराणे : एका महिलेचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

Abhay Puntambekar

उमराने । वार्ताहर

देवळा तालुक्यात गेल्या ५ दिवसापासून करोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २३ झाली असताना आता उमराने गावातही करोनाने प्रवेश केल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. गावातील एका महिलेचा नाशिक येथे अशोका रुग्णालयात ऍडमिट असताना त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

वास्तवात सदर महिला ८ दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्यामुळे गावातील एका खासगी दवाखान्यात तपासायला गेली होती. त्यांनतर त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते. या रुग्णालयात सदर महिलेचा ३ जुलै रोजीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. या महिलेची तब्येत अजून बिघडल्याने तिला दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून या ठिकाणी ५ जुलै रोजी सदर महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष मांडगे त्वरित याची दखल घेऊन उमराना येथे त्यांची टीम पाठवून या महिलेच्या परिवाराच्या संपर्कात आलेल्या ५ जण सर्वांची तपासणी करून पुढील तपासणी साठी देवळा येथे पाठवण्यात आले आहेत. तर नाशिक येथील ४ जण आयसोले ट करण्यात आल्याची व गावात सर्वेक्षण सुरू करण्यात येत असल्याची माहिती डॉ मांडगे यांनी दिली आहे

या महिलेला झालेला त्रास दवाखाण्यात दाखल झाल्यानंतर लक्षात येते, पण ही महिला उमराना गावाची असून तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या गावाची काळजी घेण्याच्या दृष्टीने सदर महिला राहत असलेल्या पोस्ट ऑफिस गल्लीला कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात आला असून, गावातील बाजारपेठ आणि कांदा मार्केट बाबत लवकरच व्यापारीवर्गाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे .

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंड वसूल करण्यात येणार आहे. नागरिकांनी मास्क घालूनच घराबाहेर पडावे. नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी. असे आवाहन सरपंच लताबाई बाळासाहेब देवरे यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com