उंबरदरी धरण तुडुंब

ठाणगावला शेतकर्‍यांमध्ये समाधान
उंबरदरी धरण तुडुंब

ठाणगाव । वार्ताहर Thangaon

गेल्या तीन-चार दिवसांपासून म्हाळुंगी नदीच्या ( Mhalungi River ) उगमस्थानी विश्रामगड परिसरात मुसळधार पाऊस ( Rain )सुरु असल्याने उंबरदरी धरण ( Umbardari Dam )तुडुंब भरले आहे.

उंबरदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने कोनांबे, बोरखिंडपाठोपाठ उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणाची साठवण क्षमता 51.92 दलघफू एवढी आहे. धरण काठोकाठ भरल्याने ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेला संजीवनी मिळाली असून परिसरातील पाच गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.

शेतकर्‍यांमध्येदेखील समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हाळुगी नदीला पूर आल्याने केळी रस्त्यावरील पुलाला पाणी लागले. पूर पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र होते. म्हाळुंगी नदीवर असलेले सर्व बंधारे भरुन म्हाळुंगी नदी दुथडी भरुन वाहू लागल्यामुळे पाण्याची आवक वाढली.

धरण तुडूंब भरल्याने धरणाचे पाणी म्हाळुंगी नदीत भोजापूर धरणात जाणार असल्याने लवकरच भोजापुर धरणही 100 टक्के भरेल असे दिसत आहे. धरण भरण्यासाठी आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम रहावा अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com