पाणवेली निर्मूलनासाठी उल्हास नदी पॅटर्न

अधिवेशनात आमदार बनकरांनी वेधले लक्ष
पाणवेली निर्मूलनासाठी उल्हास नदी पॅटर्न

निफाड । प्रतिनिधी Niphad

दक्षिणेतील गंगा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोदावरी नदीपात्रात प्रदूषण ( Pollution of Godavari River Basin )तसेच जलपर्णी मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. त्या जलपर्णीच्या( Weeds ) संदर्भात अनेकदा ‘देशदूत’च्या ( Daily Deshdoot) माध्यमातून आवाज उठवण्यात आला होता. नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार दिलीप बनकर ( MLA Dilip Bankar )यांनी प्रश्न उपस्थित करत गोदाकाठच्या या समस्येची वास्तविकता मांडली होती.

रासायनिक द्रव्ये, विनाप्रक्रिया नदीत सोडण्यात येणारे मलजल नाल्यांमधून येणारे रासायनिक पाणी यामुळे वाढणार्‍या पाणवेलीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी पॅटर्न ( Ulhas River Pattern )राबवण्याचा विचार जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे. त्यासाठी उल्हास नदीतील जलपर्णी निर्मूलनासाठी राबविण्यात आलेल्या प्रयोगाचा अभ्यास करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या अध्यक्षतेत मंगळवार (दि.29) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

बारमाही प्रदूषणाच्या वाहणार्‍या गोदावरीच्या समस्येबाबत न्यायालयाने अनेकदा ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे गोदावरी जलपर्णीमुक्त करण्यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी बैठक झाली. या बैठकित गोदावरी प्रदूषणाबाबत चर्चा करण्यात आली.

ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणारी उल्हास नदी जलपर्णीमुक्त ( Ulhas River )झाली आहे. त्यासाठी एका खासगी कंपनीमार्फत राबविण्यात आलेल्या प्रक्रियेतून ही नदी जलपर्णीमुक्त झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र गोदावरी पात्रात ही प्रक्रिया करताना जलप्रदूषण होऊ नये, तसेच जलचरांना धोका निर्माण होऊ नये याबाबत चर्चा करण्यात आली.

गोदावरी प्रदूूषणाचा आढावा घेतल्यानंतर उल्हास नदीपात्रात राबविण्यात आलेल्या प्रयोगाचा अभ्यासासाठी जिल्हाधिकार्‍यांनी समिती गठीत केली आहे. ही समिती पाहणी करून अहवाल सादर करणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी सांगितले. उल्हास नदीतून पाच मोठ्या महापालिका पाणी उचलतात.

या नदीपात्रात नेरळच्या सगुणा फाउंडेशनच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून जलपणीवर औषध फवारणी केली जात होती. याचाच परिणाम म्हणून जलपर्णी हळूहळू नाहीशा होऊन पात्र जलपर्णीमुक्त झाले. जलपर्णी निर्मूलनासाठी नदीत एक रसायन फवारण्यात आले. देशातील काही नद्यांमध्ये हा प्रयोग करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या प्रयोगामुळे साधारणपणे 3 वर्षे जलपर्णांची वाढ होत नाही. विशिष्ट कालावधीनंतर हा प्रयोग करावा लागत असल्याचे सांगण्यात येते. साहजिकच या प्रयोगाची सदरची समिती पाहणी करणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com