Nashik Sinnar Accident News : दुचाकी-ट्रकचा अपघात; कोनांबेतील दोन तरुणांचा मृत्यू

Nashik Sinnar Accident News : दुचाकी-ट्रकचा अपघात; कोनांबेतील दोन तरुणांचा मृत्यू

सिन्नर । Sinnar

येथील सिन्नर-घोटी महामार्गावर (Sinnar-Ghoti Highway) तालुक्यातील हरसुले (Harsule) येथे ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात (Accident) सिन्नर तालुक्यातील कोनांबे (Konambe) येथील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज मंगळवार (दि.१७) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली....

Nashik Sinnar Accident News : दुचाकी-ट्रकचा अपघात; कोनांबेतील दोन तरुणांचा मृत्यू
Nashik Crime News : सिन्नरमध्ये अवैध धंदे; पोलिसांकडून चार कॉफी शॉप उद्ध्वस्त

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश डावरे (१७) व दुर्गेश डावरे (२२) असे मृत तरुणांचे नाव असून गणेश व दुर्गेश सकाळच्या सुमारास आपली पल्सर दुचाकी क्रमांक एम.एच.१५ जे. जी. ९६४५ ने कोनांबे येथून सिन्नरला (Sinnar) निघाले होते. यावेळी हरसुले गावाजवळील मराठी शाळेसमोर आले असता समोरुन विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने (Truck) त्यांच्या दुचाकीला (Two Wheeler) जोरदार धडक दिली. यामध्ये दोघे युवक ट्रकच्या पुढील बाजूला धडकून रस्त्यावर फेकले गेले. यात दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला.

Nashik Sinnar Accident News : दुचाकी-ट्रकचा अपघात; कोनांबेतील दोन तरुणांचा मृत्यू
Video : सततचे अपघात, चालत्या वाहनांचे फुटतायेत टायर्स; कोटंबी, सावळघाट बनतोय मृत्यूचा सापळा

दरम्यान, यावेळी डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने रस्त्यावर रक्ताचा सडाच पडला होता. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका (Ambulance) चालक पुरुषोत्तम भाटजिरे यांना संपर्क साधून जखमी तरुणांना तात्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात (Sinnar Rural Hospital) दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दोघाही तरुणांना तपासून मृत घोषित केले. ऐन नवरात्रोत्सवाच्या काळात दोन्ही तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे कोनांबे गावावर शोककळा पसरली आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Sinnar Accident News : दुचाकी-ट्रकचा अपघात; कोनांबेतील दोन तरुणांचा मृत्यू
Nashik Road News : हप्ता न दिल्याने पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com